निष्ठूर सरकारच्या विरोधात आज उबाठा शिवसेनाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात निघणार आक्रोश मोर्चा…

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी उबाठाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा येथे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात निष्ठूर सरकारच्या विरोधात जनतेचा आक्रोश मोर्चा आज दि 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास निघणार आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात शिवसेनेच्या( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन २३ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मशाल जागर यात्रा देखील बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगाव करण्यात आली. या मशाल यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केवळ आणि केवळ घोषणाबाजी हे सरकार करत आहे. सोयाबीन- कापसाचे भाव काय आहेत? हे वेगळे सांगण्याची गरज नाही.बेरोजगारांच्या समस्याच्या वाढत आहेत. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवणारच असे याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले.
जिजामाता प्रेक्षागार जवळ टिळक नाट्यमंदिर बुलढाणा या ठिकाणी सर्व शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार त्यानंतर तिथून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा निघणार जास्तीत जास्त लोकसंख्येने या मोर्चामध्ये यावे असे आव्हान उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे