सागवान सरपंच पदाचा कारभार आता देवाभाऊ दांडगे यांच्या हातात…
सागवान ग्राम पंचायत इतिहासात प्रथमच अविरोध...

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- सागवान ग्राम पंचायत प्रथमच अविरोध झाली असून, आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात ते अविरोध झाले आहेत. देवाभाऊ दांडगे सागवान ग्राम पंचायत सरपंच पदी अविरोध झाल्याने त्यांच्या निवडीचा मोठा जल्लोष करण्यात आला. दरम्यान रेंगाळत असलेले गावातील अनेक प्रश्न मार्गी लावणार.. पारदर्शीप णे कार्य करणार.. भ्रष्टाचार होऊ नाही.. आमदार संजय गायकवाड खांद्याला खांदा लावून काम देणार यांच्या करणार अस देवाभाऊ दांडगे यांनी आश्वासित केले.
यावेळी सर्व ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी वृंद व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्चनाताई वानरे यांनी मागील ६ सप्टेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदावर देवानंद दांडगे यांची वर्णी लागली आहे. शहराच्या सीमेवर असलेल्या आणि इतिहासात उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या सागवन ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी आज निवडणुका पार पडल्या. मंडळ अधिकारी श्री पिंपळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूमिका पार पाडली. १७ सदस्यांच्या सा- गवान मध्ये ग्रामपंचायत जवळपास सर्व सदस्यांची दिल जमाई झालेली आढळली. त्यामुळे देवा भाऊ दांडगे यांच्या विरोधात कुणीच अर्ज टाकला नाही. देवाभाऊ यापूर्वी उपसरपंच पदावर विराजित होते. विशेष म्हणजे देवा भाऊ दांडगे आमदार संजय गायकवाड यांचे कट्टर समर्थक मानले जातात. सांगून ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून देवेंद्र बरडे कार्यरत आहेत. आज निर्वाचित झालेल्या सरपंच यांच्या ना- वातही देव आहे. त्यामुळे सागवन ग्रामपंचायतला देव पावला असल्याची खुमासदार चर्चा ऐकायला मिळाली.