Homeबुलढाणा (घाटाखाली)

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खा.मा.श्री.मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एकता दौड – मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..‌

Spread the love

वरवट बकाल :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-ध्यानदेव राजनकर:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खासदार मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज संग्रामपुर येथे डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वात एकता दौड – मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन युवक काँग्रेस संग्रामपूर याच्यावतीने करण्यात आले होते. संग्रामपूर पंचायत समिती संग्रामपूर ते कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय वरवर (बकाल) पर्यंत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

एकता दौड – मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी राष्ट्रीय नेते मा.श्री.मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना युवकांचे प्रेरणस्थान असलेले मुकुलजी वासनिक यांच्या राजकीय व सामाजिक जिवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

या एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेचा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी हिरवी झेंडी दर्शवून शुभारंभ केला. चार किलोमीटर अतंराच्या या स्पर्धेमध्ये सुमारे जवळपास 132 युवकांनी सहभाग नोंदविला.

यामध्ये प्रथम क्रमांक यश रामरतन पांडे, द्वितीय क्रमांक रामचंद्र गजानन मोहळ, तृतीय क्रमांक शशांक दिनकर राऊत, चतुर्थ क्रमांक चेतन अशोक करागंडे तर प्रोत्साहन पर बक्षीस  सदर कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, जिल्हा परिषद मा. अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, तेजरावभाऊ मारोडे, संतोषभाऊ राजनकर, प्रकाशबापू देशमुख, दादासाहेब वर्गे, तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, अविनाश उमरकर, मिनाक्षिताई हागे, राजेश्वर बाप्पु देशमुख, प्रवीण भोपळे,जहीर मिस्त्री, गणेश टापरे, निशिकांत देशमुख, प्रशांत गावडे, प्रतिभाताई इंगळे, पळसकर ताई, हरिभाऊ राजनकर, जगन्नाथ विश्वकर्मा, अभय मारोडे, राजुभाऊ राठोड , जुनेद शेख इमरान भाई,गणेश मानखैर, दिपक गव्हादे, संतोष टाकळकर, प्रविण पहुरकर,जलील सर, संतोष येनकर, निलेश अम्बुसकर, नितीन रावणकर, गणेश वानखेडे, सुरेश हागे, श्रीकृष्ण दातार, समीर भाई, शाम डाबरे, धर्मेंद्र इंगळे, दत्ता बोरकर, अमोल मानकर गोपाल इंगळे, आकाश बोरसे,विजय गुरव, पंकज तायडे,आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंच म्हणुन तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गजानन काळे सर, तालुका क्रिडा स्पर्धा संयोजक सुधीर मानकर सर, गजानन पैकट सर , निशिगंध सातव सर आदींनी काम पाहिले.

यावेळी मा. खा. मुकुलजी वासनिक साहेब यांना रामविजय जी बुरुंगले, प्रकशभाउ पाटील,गणेश टापरे, प्रतिभा इंगळे, प्रशांत गावंडे, राजू राठोड यांनी साहेबांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

यावेळी पोलीस प्रशासन विभागाने विशेष सहकार्य केले तथा स्पंदन फाउंडेशन तर्फे आरोग्य सेवा देण्यात आली.  यावेळी संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वानखेड येथील युवकांनी डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page