साहित्य हे मानवी जीवनाचा आधार !
मराठी वाड्मय मंडळ उद्घाटन प्रसंगी प्रा मधुकर वडोदे यांचे प्रतिपादन

नांदुरा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : स्थानिक श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा येथे दि ६ सप्टेंबर रोजी मराठी विभागांतर्गत मराठी वाड्मय मंडळ व मराठी भाषा अभ्यास मंडळ तसेच प्रकल्प लेखन व संपादक संशोधन मंडळाचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अलका मानकर मॅडम होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा मधुकर वडोदे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा प्रशांत बोर्डे लाभले होते.
कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ सुनंदा रेवसे यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विनोद वेरुळकर यांनी केले प्रास्ताविक प्रा डॉ सुनंदा रेवसे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा अनंता लाहुडकार यांनी करुन दिला आपल्या प्रास्ताविकातुन मराठी विभाग प्रमुख डॉ सुनंदा रेवसे मॅडम यांनी मराठी वांड्मय मंडळ व भाषा अभ्यास मंडळ आणि संपादक,संशोधन मंडळाचे कार्य व उपयोगीता विषद केली.
उद्घाटनीय भाषणातुन प्रा प्रशांत बोर्डे यांनी साहित्याचे मानवी जीवनातील महत्व प्रतिपादन केले तर प्रा मधुकर वडोदे यांनी त्यांच्या संपुर्ण साहित्याचा आढावा घेऊन साहित्य हे मानवी जीवनाचा आधार असुन साहित्य वाचन लेखनामधुन मानवी जीवन विकसीत होते ,व्यक्तीमत्वाचा विकास होतो व माणुस संशक्त पणे आपल्या अभिव्यक्तीचा विकास घडवुन आणु शकतो,साहित्याव्दारेच जनरंजनासोबत संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन व हस्तांतरण करुन समाजाचे विकसन साधल्या जाउ शकते असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय भाषणातुन प्राचार्या डॉ अलका मानकर मॅडम यांनी मराठी वांड्मय मंडळ व भाषा अभ्यास मंडळ च्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या कार्याची व जबाबदारीची जाणीव करुन दिली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु निशा बोरसे हीने केले