जग बदलणारा बापमाणूस या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांचे रविवारी व्याख्यान

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था अंतर्गत, अमेरिका कोलंबिया विद्यापीठ येथे आंबेडकर स्टुडंट्स ऑफ कोलंबिया यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विशेष सोहळ्याच्या आयोजना मध्ये जग बदलणारा बापमाणूस पुस्तकाच्या दहाव्या आवृत्ती चे प्रकाशन विचारवंत डॉ. सूरज एगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुस्तकाचा आशय आणि त्यातून लोकांना पटलेले जागतिक प्रेरणा दायी बाबासाहेब यामुळे लोक या पुस्तकास भरभरून प्रतिसाद देत आहेत. नव्या पिढीला नव्या भाषेत प्रेरणादायी आणि सर्वांचे बाबासाहेब जगदीश ओहोळ यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामूळे बाबासाहेबचे प्रेरणादायी विचार युवकां पर्यंत पोहचविण्यासाठी बुलढाणा येथे 29 सप्टेंबर 2024 रविवार रोजी सकाळी 11 वाजता गर्दे वाचनालय सभागृह बुलढाणा या ठिकाणी होणार आहे. पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थेचे समन्वयक व साहित्यक अजय जाधव , संस्था अध्यक्ष सचिन वायाळ व संपूर्ण आयोजक टीम यांनी केले आहे.