उमेद विभाग कायम करा या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला
उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर विविध मागण्यांसाठी आंदोलन

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कंत्राटी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.दरम्यान मागणीवर तोडगा न निघाल्यास सोमवार पासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा तीव्र इशारा यावेळी देण्यात आला.
उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेकडून महिलांचे उपजीवकाचे सर्व कामे केले जातात.या संघटनेने नाय हक्कासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले होते.दरम्यान प्रत्यक्ष झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदय व मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य यांचेसोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीत लवकरच सर्व मागण्या पूर्ण करत आहोत असे आश्वासित केले होते.१२ जुलै २०२४ रोजी तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कंत्राटी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर संघटनेने भव्य आंदोलन केले आहे.दरम्यान ‘उमेद’ची उमेद कायम असून आंदोलकांनी ‘पिक्चर अभी बाकी है !’ असा इशारा दिला आहे.