Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)

पतीने पत्नीवर  धारदार शस्त्राने केला वार पत्नी जागीच ठार !

संशयीत पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात !

Spread the love

साखरखेर्डा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) घरगुती कारणावरून पती पत्नी मध्ये झालेल्या भांडणातून पतीने पत्नीवर चक्क धार धार शस्त्राने वार करुन ठार मारल्याची घटणा लोणी येथे आज २७ सप्टेंबर रोजी दुपारी घडली . पोलिसांनी पतीस ताब्यात घेतले आहे .

लोणी ( लव्हाळा ) येथील नंदकिशोर देशमुख ( इंगळे ) आणि पत्नी प्रगती नंदकिशोर देशमुख हे दोघे राहातं होते . त्यांना दोन मुले आहेत . २७ सप्टेंबर रोजी किरकोळ कारणावरून पती पत्नी मध्ये वाद झाला . हा वाद टोकाला जाऊन नंदकिशोर देशमुख यांने धार धार शस्त्राने वार करुन प्रगती हिला ठार मारले . ही वार्ता गावात पसरताच पोलीस पाटील यांनी उपरोक्त घटणेची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांना दिली . त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पती नंदकिशोर देशमुख यास ताब्यात घेतले . मृतक प्रगती नंदकिशोर देशमुख हिचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले . मृतकाच्या नातेवाईकांना साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये तंक्रार देण्यासाठी बोलावले असून त्यांच्या तंक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page