बुलडाणा बाजार समितीची वार्षिक आमसभा संपन्न
शेतकरी हिताचा विकासरथ पुढे नेणार - जालिंदर बुधवत

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत झालेली विकास कामे ही सर्व संचालक, कर्मचाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या सहकार्य आणि विश्वासामुळे करता आलेली आहेत. हा शेतकरी हिताचा विकासरथ यापुढेही जोमाने पुढे नेणार असे अभिवचन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी दिले. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा आज उत्साहात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. गेल्या ९ ते १० वर्षात बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदि श्री जालिंदर बुधवत यांनी पदभार स्वीकारल्यापासून विकास कामांच्या माध्यमातून बाजार समितीचा कायापालट झालेला आहे. आज दिनांक २९/९/२४ रोजी शेतकरी भवन, बाजार समिती बुलडाणा येथे सभापती जालिंदर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती सौ आशाताई नंदू शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण (आमसभा) सभा संपन्न झाली. यावेळी बाजार समितीचा लेखा जोखा वाचन करण्यात आला. सभापती जालिंदर बुधवत यांनी आगामी काळात होणाऱ्या विकास कामाबाबत चर्चा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी चर्चा केली. बुलढाणा बाजार समितीला आज राज्यभरातून विविध मान्यवर भेटी देतात. सहकार क्षेत्रात बदल करू पाहणाऱ्या आणि आपल्या भागातील बाजार समितीसाठी काय करता येईल यासाठी अभ्यास चमू देखील बुलढाणा बाजार समितीमध्ये येऊन पाहणी करतात. इथला बदल जाणून घेतात. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे काम सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण करू शकलो. यापुढे कुठल्याही विकास काम करताना राजकारण आपण आड येऊ देणार नाही अशी ग्वाही जालिंदर बुधवत यांनी यावेळी दिली.
या आमसभेला बाजार समितीचे संचालक श्री लखन गाडेकर, श्री संजय दर्डा, श्री प्रशांत गाढे, श्री शेषराव कानडजे, श्री माणिकराव खांडवे, श्री सुनील सोनुने, श्री हरी सिनकर, सचिव वनिता साबळे यांच्यासह ग्राम पंचायतीचे सरपंच, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, अडते, व्यापारी, हमाल, मापारी व बाजार समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.