Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधाकर बोर्डे यांची नियुक्ती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचां पक्ष प्रवेश तथा जिल्हा कार्यकारणी संबधीत बैढक सपन्नं...

Spread the love

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर मानकर पश्चिम विदर्भ अध्यक्ष,जिल्हा प्रभारी व निरीक्षक अंबादास घेवंदे ,दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष शंकर मलवार यांच्या उपस्थिती मध्ये दिनांक 29 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे संपन्न झाला.

यावेळी किशोर इंगळे यांची बुलढाणा जिल्हा घाटाखालील अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर संजय जाधव महासचिव,सुधाकर बोर्डे जि.उपाध्यक्ष,रहेमान खान जि.उपाध्यक्ष,राहूल मोरे लोणार तालूका अध्यक्ष,सतिश नरवाडे मोताळा तालूका अध्यक्ष,हरीष राऊत मेहकर विधानसभा अध्यक्ष,गोपाल इंगळे संग्रामपुर तालूका अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.

यावेळी सृरेश डवरे, संजय जाधव यांच्यासह बुलढाणा जिल्हा प्रभारी व निरीक्षक अंबादास घेवंदे यांचीही भाषणे झाली.किशोर मानकर पश्चिम विदर्भ अध्यक्ष यांनी आपल्या भाषणामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ध्येयधोरणे स्पष्ट केले. पुढील येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढणार .आतापासूनच बूथ बांधणीचे नियोजन करण्याचे त्यांनी पदाधिकारी ,कार्यकर्ते यांना सूचित केले.

या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन शंकर मलवार यांनी केले .बुलढाणा जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकतनी वाढवणार असल्याचे शंकर मलवार यांनी सांगितले. यावेळी ,सतिश पंडागळे चिखली तालूका अध्यक्ष,सुनील साळवे यूवा तालूका अध्यक्ष चिखली संघष तरकसे,चिखली शहर अध्यक्ष. प्रा सूनिल इंगळे,निलेश मेढे,पंजाब जंवजाळ,अनिरुध इंगळे,राहुल मोरे,प्रकाश काकडे,योगेश खरात,राहूल शिरसाट, यासह अनेकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ संजय जाधव तर आभार सुधाकर बोर्डे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page