खरिप आणि रब्बी हंगामातील पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात …
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव , राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे व पिक विमा कंपनीच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी

बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्याला सुरुवात झाली आहे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंढे व पिक विमा कंपनी झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील 278547 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात 2022-23 आणि 2023-24 या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टी होवून शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पैसे मिळण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या महिन्यात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीं आणि पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या बैठक झाली होती या बैठकीमध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव जाधव सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे प्रकरणे त्वरित निकाली काढून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कंपनीचे पैसे जमा करण्यात यावे यासंदर्भात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले होते त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे यामध्ये सन 2023 24 खरीप हंगामांतर्गत 243146 शेतकऱ्यांना 233.65 कोटी रुपये रब्बी हंगामात 2561 शेतक ऱ्यांना 1.6 कोटी रुपये सन 2023 24 खरीप हंगामा अंतर्गत 221558 शेतकऱ्यांना 138.84 कोटी रुपये आणि रब्बी हंगामांतर्गत 56989शेतकऱ्यांना 125.23 कोटी रुपये असे बुलढाणा जिल्ह्यातील 278547 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 264.07 कोटी जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची कारवाई सुरू झाली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळून देण्यासाठी महायुतीच्या लोकप्रतिनिधीनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या समावेत बैठक घेवून प्रलंबित नुकसान भरपाईचे दावे मंजूर करून घेतले त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे