बुलढाणा येथे 1 ऑक्टोबरला आयुष्यमान संवाद कार्यक्रमाचे आयोजन..
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत करणार मार्गदर्शन

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):-केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध आरोग्यदायी योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेला होण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथे 1 ऑक्टोबरला आयुष्यमान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत मार्गदर्शन करणार आहेत
सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्यसेवा मिळावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचे एकत्रित आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना मोफत आरोग्य उपचार देण्यात येतो आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतची मदत रुग्णांना औषधी उपचारासाठी केली जाते या योजने संदर्भातील माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथे 1 ऑक्टोबरला बुलढाणा रेसिडेन्सी येथे आयुष्यमान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आमदार डॉ राजेंद्र शिंगणे आमदार डॉ संजय कोटे आमदार डॉ संजय रायमुलकर आमदार आकाश फुंडकर आमदार संजय गायकवाड आमदार श्वेताताई महाले आमदार राजेश एकडे अमरावती विभागीय आयुक्त डॉ निधी पांण्डेय आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य विभागाचे संचालक श्रीरंगा नाईक राज्याचे आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ कमलेश भंडारी जिल्हाधिकारी डॉ किराण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात उपस्थित राहणार आहे आयुष्यमान भारत योजने संदर्भात मार्गदर्शन मान्यवर करणार असून आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांसोबत ही संवाद साधलेल्या जाणार आहे . या कार्यक्रमादरम्यान आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचाही वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यत येणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे अस आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते यांनी केले आहे …