मलकापूर मच्छीमार समाजासाठी नवीन भूजल महामंडळाची स्थापना होणार –सुधीरभाऊ मुनगंटीवार.

मलकापूर -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- करण झनके:- मुंबई दिनांक 30/ 9/ 2024 रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक तथा मत्स्यव्यवसाय यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मत्स्य विभागाचे वेणूगोपाल रेड्डी, आयुक्त व्यवसाय डॉ.अतुलजी पाटणे, महाराष्ट्र उपसचिव श्री कि.म. जकाते, एडवोकेट अमोल बावणे महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग विकास धोरण समिती सदस्य, श्री. अमितजी चावले सहित इतर प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मासेमारी करणारा समाज व संस्था ह्या भूजल जलाशयात मासेमारी करतात, त्याकरिता त्यांच्या विकासाच्या उद्देशाने भूजल महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. महामंडळ स्थापन झाल्यावर त्याचे कार्यालय नागपूर येथे स्थापन करावे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मासेमारी करणाऱ्या नदी, नाल्यातील समाज व मत्स सोसायटीचा यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी या महामंडळाचा उद्देश आहे. त्याकरिता एडवोकेट अमोल बावणे महामंडळ कार्य प्रणालीसाठी वेळोवेळी सूचना व माहिती पुरवावी व अधिकाऱ्यांनी योग्यत्या सूचनांवर अंमलबजावणी करावी. असा आदेश देण्यात आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायिक लोकात आनंदाची भावना पसरली आहे.