माँ आदिशक्तींच्या जागरात उद्योगिनींच्या प्रदर्शनीचे मोठ्या उत्साहात उद्घाटन
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची 'दिशा' बचत गटाची प्रदर्शनी पाहण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी उद्योग शक्तीचा केंद्रबिंदू असलेल्या दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन अंतर्गत आज पासून 3 दिवस भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनीला येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोरच्या प्रशस्त प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच महिलांची तुडुंब गर्दी दिसून आली आहे.गेल्या वर्षी या प्रदर्शनी मधून 10 कोटींवर उलाढाल झाली होती यावर्षी मात्र हा आकडा जमलेल्या गर्दीवरून अधिक फुगणार असल्याचे दिसते. दीड हजारावर अधिकृत नोंदणी झाली होती. प्रदर्शनीत 250 पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत.
दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन अंतर्गत भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या रोहिणी ताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या सरचिटणीस तथा प्रवक्त्या हेमलता ताई पाटील या उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे या उपस्थित होत्या.या शिवाय अनेक मान्यवरांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली आहे. 4 ते 6 ऑक्टोंबर दरम्यान चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनीची उत्सुकता लागून होती. आज प्रारंभ झालेली ही बचत गटाची प्रदर्शनी भीमथळी जत्रेच्या खाजगी पातळीवर ही पहिली भव्य प्रदर्शनी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. सुरुवातीला रोहिणी ताई खडसे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की राज्य सरकार महिलांना लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देते मात्र दुसरीकडे महागाई वाढून ती परत घेत आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होते असे ते यावेळी बोलत होत्या. त्यानंतर शिवसेनेची बुलंद आवाज म्हणजेच शिवसेनेच्या प्रवक्ता सुषमाताई अंधारे यांनी तर राज्य सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री हे आता समोर येत आहे मात्र इतक्या दिवस कुठे होते असे ते यावेळी बोलत होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रमुख पाहुण्यासह जयश्री ताई शेळके या बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्यपाल यांना भेटण्यासाठी विश्राम भवन येथे गेले होते मात्र त्यांना दीड तास प्रतीक्षा करावी लागली. राज्यात महिलांवर होणारे अत्याचार या विरोधात त्यांनी राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या व त्यांना निवेदन देणार होते मात्र दीड तास त्यांना त्या ठिकाणी बसावे लागले असे त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.
आजच्या या कार्यक्रमांमध्ये महिलांनी आपले स्टॉल लावलेले होते. ही प्रदर्शनी आजपासून सतत तीन दिवस चालणार आहे त्यामुळे बुलढाणा करांसह जिल्हा वासियांनी या ठिकाणी येऊन या प्रदर्शनीला आपली भेट द्यावी असे आव्हान दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी केले आहे