मुधडा पेट्रोल पंप समोर अज्ञात ट्रॅक्टरने ऑटोला उडवल्याने ऑटो मधील ४ प्रवासी गंभीर जखमी

मलकापूर : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- करण झनके:-दिनांक ६ऑक्टोबर रोजी रात्री ९. वाजेच्या दरम्यान मलकापूर ते उमाळी जात असलेला ऑटो क्रमांक एम एच २८ टी २८०४ अज्ञात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनी धडक देऊन पसार झाल्याची घटना घडली त्या वेळी स्थानिक नागरिकांनी जखमी प्रवाश्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार साठी भरती केले असता ऑटो चालक राजेंद्र गिरी वय ४५ उमाळी गंभीर जखमी महिला नौशाद बी शेख युनूस वय ४५ उमाळी व शेख युनूस शेख इस्माईल उमाळी वय ५५ याचे प्राथमिक उपचार करण्यात आले तिन्ही प्रवासी पेशंट याच्या पाय तिरपे झाले व डोक्याला मार लागून रक्त प्रवाह सुरू असल्याने त्यांना डॉ नीरज शिरसागर यांनी बुलढाणा रेफर करण्याचे निर्णय घेतले या घटनेची माहिती मलकापूर शहर पोलिस स्टेशनला दिली असता पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्गे साहेब करीत आहे.