लोणार मध्ये हॉटेल व्यावसायिक तरुणावर चाकु हल्ला

लोणार आपलं बुलढाणा जिल्हा बातमी(राहुल सरदार):-लोणार मधील धार चौकातील संतोष रामकृष्ण शेडुते वय ३९ वर्ष यांचे मधुर स्वीट मार्ट आहे या दुकानावर ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजे दरम्यान आरोपी संतोष बंडू मिसाळ वय २५ व सुरेश नामदेव आरे वय ४४ वर्ष हे पाण्याची बॉटल घेण्यासाठी आले पाण्याची बॉटल घेतल्या नंतर त्यांनी बॉटल च्या पैश्याची मागणी केली असता तुला समजत नाही आम्ही कोण आहे तुला माहीत नाही का आम्ही लोणार चे बाप आहे आमच्या नादी लागू नको लोणार चे चांगले चांगले लोक आमच्या नादी लागत नाही आमच्या कडे पैसे नाहीत म्हणत शिवीगाळ करत धारा धार चाकूने ३ वार करून हल्ला केला या मधे संतोष रामकृष्ण शेडुते हे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले बिट जमादार संजय जाधव नितीन खरडे अनिल शिंदे संतोष चव्हाण घटनास्थळी दाखल झाले या नंतर घटनास्थळा पळून गेलेल्या आरोपीना काही वेळातच शोधून सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले नितीन खरडे बिट जमादार संजय जाधव अनिल शिंदे यांनी जेरबंद केले या नंतर जखमी चे भाऊ सचिन रामकृष्ण शेडुते यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी कलम १०९(१),३५२,३५१(२)३(५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास लोणार पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले नितीन खरडे करीत आहेत.