अवघ्या 24 तासाच्या आत मोबाईल चोरट्यांच्या शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) चोर कितीही शातीर असला तरी,पोलिसांच्या पकड मध्ये येतोच!असाच एक मोबाईल चोर पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केला आहे .
मोबाईल शॉपी फोडून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यांना शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत गजाआड केले आहे. 5 ते 6 ऑक्टोंबरच्या मध्यरात्री बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या माऊली मोबाईल शॉपी या दुकानात चोरट्यांनी हात साफ केला होता. यामध्ये काही मोबाईल हेडफोन चार्जर असा बराच मुद्देमाल नगदी 18 हजार रुपये असा एकूण 34000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता. चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवघ्या 24 तासाच्या आत गोपनीय माहितीद्वारे आरोपींना शिताफीने पकडले. या घटनेमध्ये 5 आरोपींचा समावेश आहे. यामध्ये एक आरोपी हा अल्पवयीन आहे.
पकडण्यात आलेले आरोपी भागवत गोविंद राऊत वय 21 वर्ष रा उदयनगर, ऋषिकेश शालिकराम जाधव वय वर्षीय रा उदयनगर, आकाश रामदास काळे वय 22 वर्षे रा उदयनगर, अनिकेत नारायण हरकल वय 25 वर्षीय रा सागवान तर एक आरोपी हा अल्पवयीन आहे असे या चार आरोपीसह एक अल्पविन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ शशिकांत धारकरी, पो.काॅ.युवराज शिंदे,पो.कॅ विनोद बोरे, ना.पो.काॅ.सुनील मोजे, पो.कॅ.गणेश टेकाळे, चालक शेख रहीम यांनी ही कारवाई केली आहे.