डॉ. ऋतुजा चव्हाण जनतेच्या मनातील उमेदवार… आता राजकीय समिकरणे बदलणार

डोणगांव:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: विधानसभा निवडणुक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने जोरदार कामाला लागले आहेत. मेहकर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची याबाबत वरिष्ठांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मात्र, उमेदवारीची माळ कोणाच्याही गळ्यात पडो, पण महिला उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण मेहकर विधानसभा मतदारसंघात राजकीय समिकरणे बदलवणार एवढे मात्र निश्चित आहे.
मेहकर मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आहे. या ठिकाणी महायुतीकडुन शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची उमेदवारी निश्चित झालेली दिसत आहे. यांनी तिनवेळा चढत्या बहुमतांनी निवडून येऊन आमदारकीची हॅटट्रिक केली आहे. आता तर चौकार मारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातचं प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले शिवसेनानेते सिद्धार्थ खरात हे शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी मुंबई दौरे करीत आहेत. यामुळे यांचीही उमेदवारी जवळपास निश्चित होऊ शकते अशी चर्चा आहे. सध्या निवडणूक जाहिर होण्याच्या अगोदरच राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. त्यांचं अनुषंगाने अद्याप फायनल उमेदवारी कोणाची नसलीतरी डॉ. ऋतुजा चव्हाण जनतेच्या मनातील उमेदवार असल्यामुळे जनतेच्या आग्रवास्तव विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. मेहकर मतदारसंघात एक महिला उमेदवार म्हणून डॉ. ऋतुजा चव्हाण या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवणार तर आहेत. पण भविष्यात डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी निवडणूक तिसऱ्याच पक्षाकडून लढविल्यास याचा फटका नेमका कोणाला बसणार आहे. हे सांगणे सध्यातरी कठिन आहे. मात्र, महिला उमेदवार या नात्याने सहानुभूतीची लाट उसळली तर मतदारसंघात परिवर्तन निश्चित होऊ शकते. तसं राजकीय समिकरणे बदलाव करण्यासाठी डॉ. ऋतुजा चव्हाण सक्षम महिला उमेदवार आहेत. हे आजच्या राजकीय समिकरणावरुन चर्चा होत आहे. एक महिला उमेदवार असताना सुद्धा त्या सातत्याने जनहितासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजात पूढे असतात, एवढेच नाही तर, गोरगरीबांना मदतीचा आधार देत असतात, वंचितांच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून या सर्वांचा आवाज बुलंद करून शासनदरबारी न्यायाची मागणी करीत असतात. अशा कर्तृत्ववान महिला डॉक्टर ऋतुजा चव्हाण जनतेच्या आग्रहास्तव आता मेहकर विधानसभा निवडणुकीत उतरल्या तर नक्कीच महायुतीच्या व महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी एक महिला उमेदवार या नात्याने आणि त्यांच्या कर्तृत्वाने मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलाव करु शकतात अशी चर्चा जोर धरत आहे. एक महिला उमेदवार असल्यामुळे पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून डॉ. ऋतुजा चव्हाण सध्यातरी त्यांचे नांव पुढे येत आहे. अशी संपूर्ण मतदारसंघात राजकीय चर्चा सुरू आहे. मेहकर मतदारसंघातही जनतेच्या मनामनात परिवर्तन करण्याची तयारी आहे. त्यामुळेच डॉ. ऋतुजा चव्हाण ह्या मतदारसंघात पर्याय म्हणून आपल्या पसंतीचे आणि जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून डॉ ऋतुजा चव्हाण सक्षम आहेत. यावेळी डॉ. ऋतुजा चव्हाण नक्कीच राजकीय समिकरणे बदलाव करु शकतात अशी मतदार संघात चर्चा आहे.