ज्येष्ठ नागरिकदिन सप्ताहदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांकरता मोफत नेत्रचिकित्सा व दंत चिकित्सा शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते

बुलढाणा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी डॉ.चिंचोले नेत्रालय व चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघटना तथा रेणुका माता डॉ. चिंचोले नेत्रालय व ज्येष्ठ नागरिक संघटना तथा रेणुका माता ज्येष्ठ नागरिक संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिन सप्ताहानिमित्त खास जेष्ठ नागरिकांकरिता मोफत नेत्रचिकित्सा व दंत चिकित्सा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुलढाणा शहरातील चिंचोली चौक परिसरातील डॉ. चिंचोले हॉस्पिटल येथे करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी त्याठिकाणी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी,डॉक्टर श्री वसंतराव चिंचोले,श्री मधुसुधन कुलकर्णी, श्री तेजराव सावळे,डॉ. शोण चिंचोले,लक्ष्मणराव खर्चे,अविनाश धांडे,विनायक खराटे,वैजयंती कस्तुरे,उषा दलाल,उषा गणोरकर, प्रमिला गवई यांच्यासह मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक माता-भगिनी उपस्थित होते…