केंद्रीय आयुष आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते अमृत औषधालयाचे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात झाले लोकार्पण
नामांकित कंपनीचे औषधी मिळणार माफक दरात बुलढाण्यातील अमृत औषधालय केंद्र महाराष्ट्रातील सातवे

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात उत्तम दर्जाची आणि नामांकित कंपनीची औषधे मिळण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने अमृत फार्मसी औषधालय केंद्र सुरू करण्यात आले आहेत बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते नुकतेच अमृत औषधाला यायचं लोकार्पण करण्यात आलं असून महाराष्ट्रातील हे अमृत औषधालय सातवे…
केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सार्वजनिक आरोग्य धोरणे तयार करण्यात आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ते आरोग्य सेवा प्रणाली सुधारण्यासाठी, आरोग्य संकटांना प्रतिसाद देण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे सामुदायिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन गुणवत्ता सुधारण्यावर होणार आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) केंद्र सरकारच्या “अमृत फार्मसी” योजनेअंतर्गत एक नवी फार्मसी उघडली जाणार आहेत . “अमृत” म्हणजे परवडणारी औषधे आणि विश्वासार्ह इम्प्लांट्स, ज्याचा उद्देश कॅन्सर, हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांसाठी स्वस्त दरात औषधे आणि इम्प्लांट्स उपलब्ध करून देणे हा आहे. देशातील 28 राज्यांमध्ये 240 “अमृत” फार्मसी आहेत, आणि महाराष्ट्रातील हे सातवे असेल. या योजनेमुळे गरीब आणि गरजू लोकांना 60% पर्यंत सवलतीत उत्तम दर्जाची औषधे मिळतील,सर्व प्रकारच्या पेटंटेड, मार्केटेड आणि ब्रँडेड जेनेरिक औषधं, शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री, इम्प्लांट्स, हृदयरोग (कार्डियोलॉजी), नेत्रविज्ञान (ऑप्थाल्मोलॉजी), आणि अस्थिरोग (ऑर्थोपेडिक्स) यांसारख्या सामग्री ह्या औषधालयात माफक दरत सर्वासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे
बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अमृत औषधालय केंद्राचे उद्घाटन नुकतंच केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले यावेळी एच एल एल लाईफ केअर लिमिटेड क्षेत्रीय प्रबंधक योगेंद्र शर्मा व्यवस्थापक श्रीलेश वाळके,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स , परिचारिका व नागरिक उपस्थित होते.