“स्वयमप्रभा” योजनेअंतर्गत टि.व्ही. वाटपाचा तिसरा टप्पा पुर्ण
लाडक्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नती करीता नरेंद्र मोदींची 'स्वयमप्रभा' योजना: माजी आमदार विजयराज शिंदे

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लाडक्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नती करीता स्वयमप्रभा योजना सुरू केली. ही योजना समाजातील सर्व घटकाच्या विद्यार्थीसाठी असल्याची माहिती यावेळी माजी आमदार विजयराव शिंदे यांनी दिली. व्यासपीठावर कामगार आघाडीचे महाराष्ट्र सचिव विश्राम पवार, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी नितीन शिरसाठ, लोकसत्ता चे जिल्हा प्रतिनिधी संजय मोहिते, भाजपाचे शहराध्यक्ष अनंता शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार विजयराव शिंदे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सबका साथ, सबका विकास” ही घोषणा दिली होती त्यानुसार “स्वयमप्रभा” ही योजना सुद्धा समाजातील प्रत्येक जाती-धर्माच्या व घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. देशातील गरिबातील गरीब विद्यार्थ्याला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडल्या विद्यार्थ्यांकरिता स्वयंप्रभा योजनेअंतर्गत 900 रुपयात स्मार्ट टीव्ही देण्याची योजना सुरू केली आहे. ही योजना आपण बुलढाणा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांकरिता आणली असून या योजनेचा आज तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. पहिल्या टप्प्यातील ज्या विद्यार्थ्यांना टीव्ही मिळाला त्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या 14 हजार 900 रूपया पैकी 14 हजार रुपये परत मिळणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांच्या खात्यात दोन तर काही विद्यार्थ्यांच्या खात्यात चार हजार रुपये परत यायला सुरुवात झाली आहे.
आज हजारो विद्यार्थ्यांनी माझ्या शिवालयात विनामूल्य अर्ज भरलेला आहे. अर्ज भरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला टप्प्याटप्प्याने टीव्ही दिल्या जात आहे. अर्ज भरेल त्याला टीव्ही हा आपला उद्देश असून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपण या योजनेचा लाभ मिळवून देणार आहे. नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या प्रत्येक योजना ह्या घरोघरी पोहोचविण्याकरिता आपण कटिबद्ध असून याचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा अशी विनंती ही यावेळी माजी आमदार जरा शिंदे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष अनंता शिंदे यांनी केले.