नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्यावे
सरसकट पिक विमा देण्यात यावा-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष निलेश नारखडे

मलकापूर:- (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-करन झनके ):- मागील तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार व अतिवृष्टी पावसामुळे शेतीतील पिकांचे, शहरात व गावागावात नळगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरल्यामुळे घरांचे, दुकानांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नागरिक धास्तावले असून असंख्य नागरिकांचे घरे पाण्याखाली गेल्याने ते बेघर झाले आहेत. शासनाने व महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून सर्व पूरग्रस्त व नुकसानग्रस्त नागरिकांना सानुग्रह अनुदान द्यावे. तसेच मलकापूर नांदुरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देण्यात यावा बहुदा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी. अशी मागणी आज तहसीलदार मलकापूर यांना निवेदन देऊन केली.दोन दिवसांत सानुग्रह अनुदान नागरिकांना न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईलअसा इशारा युवा जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी दिला. निवेदन देतेवेळी विवेक भाऊ पाटील ललित ढवले दीपक भाऊ पिंगळे पंकज तायडे इत्यादी हजर होते