Homeबुलढाणा (घाटावर)

लोणार सरोवर येथे स्वच्छता ही सेवा अभियान उत्साहात 

Spread the love

लोणार :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी(राहुल सरदार)लोणार सरोवर येथे भारत सरकार च्या स्वच्छता ही सेवा 2024 या उपक्रमा निमित्त दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी.सकाळी 11:00 ला Geological survey of india भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण च्या (IAS) गीतिका शर्मा डेप्युटी सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ माईन्स व त्यांच्या चमू ने मि लोणारकर टीम सोबत स्वच्छता मोहिम राबवली. भारतातील प्रत्येक भू वारसा स्थळांना हा उपक्रम राबवणार आहेत असे या वेळी त्यांनी सांगितले.

तसेच सरदार वल्लभाई पटेल येथे स्वच्छता हीच सेवा या विषयावरील चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आली या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस हि देण्यात आले. याप्रसंगी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुणे येथून डायरेक्टर डॉ मनीष जॉन, डायरेक्टर विनोद बराटे, तसेच मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे यांनी सर्वांना सरोवराची माहिती दिले टीम चे विलास जाधव, विनय कुलकर्णी, शैलेश सदार, कमलेश आगरकर, उमेद चिपडे, विशाल गरकळ, प्रविण इंगळे उंबेरकर टीम च्या सतत कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह ही देण्यात आले यावेळी पुरातत्व विभागाची टीम , वन्यजीव विभाग तसेच सर्व गाईड , सरदार वल्लभाई पटेल चे शिक्षक वृंद व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page