व्ही. सि. ए.ची 15 वर्षाखालील शालेय खेळाडूंकरिता ( मुले व मुली) करिता निवड चाचणी

मलकापूर -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर द्वारा आयोजित विदर्भातील सर्व जिल्हातील ग्रामीण व शहरी विभागातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी व त्यांचा गुणवत्तेला न्याय देण्यासाठी बुलढाणा जिल्हा मध्ये मुले व मुलींसाठी विदर्भ क्रिकेट संघटने द्वारे 15 वर्षाखालील निवड चाचणी घेणार असून या निवड चाचणी करिता 15 वर्षा आतील 1/9/2009 ते 31/08/2011 पर्यंत जन्मलेले खेळाडूं ह्या निवड चाचणीसाठी पात्र राहतील या निवड चाचणी करीता विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर येथून निवड समिती चे सदस्य येणार असून वरील निवड चाचणी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा फी आकारण्यात येणार नाही. याची सर्व खेळाडूंनी आणि पालकांनी नोंद घ्यावी हि निवड चाचणी तालुका क्रीडा संकूल मलकापूर येथे दि. 20/10/2023 रोजी रविवार सकाळी 9 वाजता पासून दुपारी1 वाजेपर्यंत मुलांची व दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत मुलींची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंनी आपल्या क्रिकेट चे साहित्य व पांढऱ्या पोशाखा सह ओरिजनल जन्माचे प्रमाणपत्र,आधार कार्ड व शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट सह, तालुका क्रीडा संकूल मलकापूर येथे समन्वयक चंद्रकांत साळुंखे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच खेळाडूंनी आप आपल्या तालुक्यातील तालुका प्रतिनिधी व तालुका क्रीडा शिक्षक यांच्याशी मलकापूर सनी साळुंखे, व श्याम सिंह हजारी उमेश शिंदे व खामगाव पुरुषोत्तम निळे, शेगाव यश परिहार, जळगाव जामोद विनोद घोडे . संग्रामपूर उमेश वानखेडे, नांदुरा राजेश भोसले व जिया खान,चिखली भिकाजी शेटे व मोहम्मद सौदागर व तुळशीदास काटे लोणार मोहमद फिरोज, मेहकर राहुल बाभुळकर , मोताळा संजय सावळे सर,व रविकांत जयस्वाल सिंदखेड राजा रामेश्वर इंगळे,देऊळगाव राजा येथे राजू साळोख बुलढाणा सुशील वानखेडे ह्या तालुक्या प्रतिनिधी व तालुका क्रीडा शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा व या निवड चाचणी साठी जास्तीत जास्त खेळाडूंनी हजर राहावे असे आवहान व्ही सी ए चे जिल्हा समिती चे (अध्यक्ष) शरद पाध्ये सर तसेच व्ही. सी. ए. चे बुलढाणा जिल्ह्याचे ( संयोजक ) किशोर वाकोडे यांनी केले आहे.