शेतकऱ्यांची चेष्टा थांबवा, अन्यथा विमा कंपनीला गंभीर परिणाम भोगावे लागतील: ऋषांक चव्हाण

डोणगांव:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-विमा कंपनीने शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये. आता शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी. अन्यथा विमा कंपनीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मेहकर विधानसभा मतदारसंघातील ऋषांक चव्हाण यांनी सोनाटी गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना त्यावेळी बोलत होते.
शेतकरी नेते रविकांत तुपकर व डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या मार्गदर्शनखाली मेहकर मतदारसंघातील सोनाटी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ऋषांक चव्हाण बोलत होते. नैसर्गिक आपत्तीत शेतातील उभ्या पिकांची माती झाली आहे. तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा विमा देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. आजही बहुतांश शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात विमा कंपनीकडून विमा आलेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे. अशा अवस्थेत विमा कंपनीकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. विमा कंपनी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा आतातरी थांबवावी अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरला तर विमा कंपनीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा निर्वाणीचा इशारा ऋषांक चव्हाण यांनी सोनाटी येथे दिला आहे.गेल्या खरीप हंगामात पावसामुळे पिकांची नासाडी झाली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी विमा कंपनीच्या विरोधात महाराष्ट्रभर रान पेटविले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारला होता. त्यामुळे विमा कंपनीकडून तात्पुरती काही मोजक्या शेतकरी बांधवांच्या बॅक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात आली. मात्र आजही मेहकर मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे विमा कंपनीकडून होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्यासाठी त्रास दायक आहे. त्यामुळे मतदारसंघातील सोनाटी येथील शेतकरी एकवटले होते. त्यावेळी ऋषांक चव्हाण शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते तेव्हा ऋषांक चव्हाण यांनी विमा कंपनीला थेट इशारा देत म्हणालेत की, आता शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ऋषांक चव्हाण, यांच्यासह रोशन काबरा, सागर सोळंके , गजानन तिजारे, विनोद काताडे,रवि फुके व शेकडो पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.