राज्यातील दारिद्र्य रेषेखालील मेहतरांना बिपिएल कार्ड देण्यात यावे – शेख अनीस

बुलढाणा: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- राज्यातील दारिद्र्य रेषेखालील मेहतर समाजाच्या लोकांना बिपिएल कार्ड वितरित करण्यात यावे अशी मागणी मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस शेख बुढन यांनी तहसिलदार बुलढाणा यांना दि १६ ऑक्टोंबर २०२४ रोजी निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,महाराष्ट्र राज्यात अनेक मेहतर समाजातील नागरिक हे दारिद्य्र रेषेखालील असून आपल्या जीवाची कोणतीही परवा न करता मिळेल ते सफाई काम करून आपला उदर निर्वाह करीत आहे. शासनाने या गोष्टीची दखल घेऊन दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या मेहतर समाजाच्या लोकांना संदर्भिय पत्र सकापू/२००९/प्र.क्र.१४१/पा पू २१पाणी पुरवठा व स्वचछता विभाग मंत्रालय मुंबई ४०००३२ दी.२२ जुलै २००९ नुसार बीपिएल कार्ड वितरित करण्यात यावे असे आदेशित केलेलं आहे,तरी दारिद्र्य रेषेखालील मेहतर समाजाच्या लोकांना लवकरात लवकर बीपिएल कार्डचे वितरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.