सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथे पोलीस प्राशासंन यांच्या कडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कार्यशाळा

बुलढाणा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-स्थानिक स. वि. म.डोंगर खंडाळा येथे दिनांक 19 ऑक्टोबर रोजी आदरणीय भाईजी यांच्या प्रेरणेने व डॉ. श्री सुकेशजी झंवर सर यांच्या मार्गदर्शनातून , तसेच सौ. कोमलताई झंवर मॅडम यांची “शिस्तप्रिय विद्यार्थी आणि जागरू विद्यार्थी” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर व त्यातून घडणारे गुन्हे तसेच त्या संदर्भातील कायदे याबाबत विद्यार्थी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश रोढे यांनी मा.माळी साहेब यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच सहाय्यक पोलीस श्री दिलीप बोरसे यांचे स्वागत श्री देशमाने व श्री जाधव साहेब यांचे स्वागत श्री गाढवे यांनी केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून श्री माळी सर यांनी मुलांना जीवनात उंच ध्येय ठेवून त्या दिशेने प्रयत्न कसे करावे, जीवन जगत असताना नियमांचे पालन, समाजाप्रती असलेली जबाबदारी कशी ओळखावी,मोबाईल व दुचाकी यांचा अवाजवी वापर, वाहतुकीचे विविध नियम, इंस्टाग्राम, facebook,स्नॅपचॅट्स इत्यादी वापरत असताना घ्यावयाची काळजी,ट्रू कॉलर चा योग्य वापर, सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीबाबत जागरूकता,एटीएम वापरताना घ्यावयाची काळजी,स्टेटस तसेच डीपी ठेवताना घ्यावयाची दक्षता, तसेच पासवर्ड व वायफाय बद्दलची महत्त्वपूर्ण माहिती अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन घुले आभार प्रदर्शन श्री केतन गीते यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले.