उर्वरित हक्काच्या पिक विमा साठी गावागावात वनवा पेटला शेतकऱ्यांमध्ये पिक विमा कंपनी च्या विरोधात तीव्र रोष : डॉ ज्ञानेश्वर टाले
2023 ते 2024 सोयाबीन व हरभऱ्याचा पिक विमा न भेटल्यामुळे गावागावात सत्ताधाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी _ऋषांक चव्हाण

मेहकर : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-मेहकर व लोणार तालुक्यातील पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या गावागावात संवाद बैठका घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचे हक्काच्या लढाईसाठी शेतकऱ्यांनी तयार रहावे.आपला हक्काचा पिक विमा सरकारच्या व कंपनीच्या मानगुटिवर बसून घेऊ तोपर्यंत ही शेतकऱ्यांची लढाई थांबणार नाही मेहकर व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व संवाद बैठका गांवागावात डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या उपस्थितीत होत आहेत.मेहकर तालुक्यातील मौतखेड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की जोपर्यंत उर्वरित सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा मिळणार नाही तोपर्यंत गावा गावामध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकारने जर पिक विमाचा त्यांचा हिस्सा दिला नाही तर येणाऱ्या काळात शेतकरी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
पिक विमा हा आमचा हक्क आहे.व त्यावरील १२% व्याज सुध्दा शेतकऱ्यांना मिळायला पाहीजेत. जर शेतकऱ्याच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न कोणी करत असेल त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय लोकं करत असून आपली राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना आमचं सांगणं आहे की नौटंकी कोण करते कोण नाही हे सगळे शेतकऱ्यांना माहित आहे.तारीख पे तारीख कोण देत आहे. पीक विमा मागणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करणार लवकरच ही पीक विम्याची लढाई एका वेगळ्या स्वरूपात पुढे येणार आहे यामध्ये गावागावात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून दिल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही असा शब्द डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी यानिमित्ताने दिला. यावेळी डोणगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष ऋषांक चव्हान देवा भाऊ आखाडे सलीम शहा दशरथ बोरे मोहन नवले,मोठ्या संख्येने गावातील शेतकरी पदाधिकारी कार्यकर्त्ते उपस्थित होते.