जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला शक्ती अजितदादा बरोबरच-रा.काॅ. महिला जिल्हाध्यक्ष प्रा अनुजा सावळे पाटील

बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- नुकताच तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्यामुळे उमेदवार सोयीनुसार राजकारण करीत आहे. जेवा वाटले तेव्हा त्या पक्षात प्रवेश घेत आहे. डॉ राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शरद पवार गटात गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे यांनी आम्ही अजित दादा पवार यांच्या सोबत असल्याचे विधान केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे यांनी सांगितले की जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला शक्ती अजित दादा पवार सोबत असणार आहे. खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करत त्यांच्या सबलीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय घेणारे अजित दादा पवार,प्रांताध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब, प्रांतध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात मी संघटना बांधत असतांना नेहमीच दादांचे वरिष्ठा चे सहकार्य प्रोत्साहन कौतुक ही लाभते एका पदाधिकारी कार्यकर्त्याला अजून काय हवंय फक्त महिलाच नाही तर शेतकरी, युवा, वृद्ध आणि गरजू यांसाठी सतत झटणारे नेते म्हणजे अजितदादा.अर्थमंत्री दादा अनेक वर्षांपासून राज्याचा कारभार बघत आहेत हे करत असतांना दादांनी बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी भरघोस निधी दिलाय. मग शेगाव विकास आराखडा असो, खडकपूर्णा -जिगांव प्रकल्प ला मदत असो, बुडत्या जिल्हाबँकेला निधी तरतूद असो, असे अनेक आपल्या जिल्ह्याच्या हिताचे निर्णय दादांनी घेतले. म्हणूनच येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या आणि समाजातील सर्व घटकाच्या विकासासाठी मी आहे अजितदादा सारख्या विकासाभिमुख, जबाबदार, दमदार आणि वाद्याला पक्क्या असणाऱ्या नेत्या बरोबर म्हणजेच दादांबरोबर आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अनुजा ताई सावळे यांनी सांगितले आहे