Homeबुलढाणा (घाटावर)

विधवा महिला प्रतिबंधक कायदा ,आर्थिक विकास महामंडळ आदी मागण्यासाठी महामेळावा…

जाहीरनाम्यात एकल महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहू - प्रा. डी एस लहाने

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-  विधवा परितक्ता व एकल महिलांचा महामेळावा आज बुलढाण्यात भरगच्च उपस्थितीत पार पडला. विधवा महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,एकल महिलां साठी धोरण तयार करावे यासह विविध मागण्यांसाठी महिलांनी महामेळांव्यातून आज हुंकार भरला. निवडणुका पुढ्यात आहे. राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यातून विधवा, एकल महिलांविषयी भूमिका मांडावी, विधवांचे प्रश्न जाहीरनाम्यात मांडणाऱ्या पक्षाच्या पाठीशी राज्यातील विधवा महिला उभ्या राहतील व त्यांना पूर्ण सहकार्य करतील असे प्रतिपादन यावेळी मानस फऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने यांनी केले.

येथील सैनिक मंगल कार्यालयात दुपारी मेळाव्याला सुरुवात झाली. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य शाहिनाताई पठाण होत्या. तर प्रा. डी एस लहाने,प्रतिभाताई भुतेकर, अनिता कापरे, व इतरांची उपस्थिती राहिली. विधवा महिलांचे प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे.त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही सकारात्मक दिसत नाही. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मानस फाउंडेशनच्या वतीने बुलढाण्यातून चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज येथील सैनिक मंगल कार्यालयात विधवा महिलांचा महामेळावा घेण्यात आला.

निवडणुकीच्या तोंडावर अनेक विषय चर्चेत येतात, राजकीय पक्ष जाहीरनामा प्रकाशित करतात, परंतु विधवांना राजकीय पक्षांच्या लेखी किंमत नसते. तसेच राजकीय व्यक्तीही त्यांचे प्रश्न कधी मांडत नाही.राजकीय पाठबळ असेल तर समस्या सोडविल्या जातात. नेमके याच विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मानस फाउंडेशन च्या वतीने हा महामेळावा घेण्यात आला. या माध्यमातून राजकीय पक्ष व नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.प्रास्ताविक मधे प्रा. डी एस लहाने म्हणाले, विधवा एकल परितक्ता महिलांसाठी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काम सुरू केले आहे. गेल्या दोन-चार वर्षापासून हे काम सुरू आहे. सध्या निवडणुका आहेत.मात्र निवडणुकीमध्ये महिलांचे प्रश्न मांडताना कोणी दिसत नाही. राजकीय पक्षांनी साचेबद्ध भूमिका घेतल्या आहे. मतदार म्हटले तरी महिलांची संख्या कमी नाही. त्यातही विधवा महिलांची संख्या ही देखील मोठी आहे. एखादं सरकार आणणे किंवा पाडण्याची ताकद महिलांमध्ये आहे. त्यामुळे विधवा महिलांचे प्रश्न हे अग्रक्रमाने राजकीय पक्षांनी घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. आपल्या जाहीरनामा मध्ये जे राजकीय पक्ष विधवा महिलांना स्थान देतील, त्यांचे प्रश्न सोडवण्याची हमी देतील, तसा स्पष्ट उल्लेख त्यांच्या जाहीरनाम्यात करतील, अशा राजकीय पक्षाच्या पाठीशी महाराष्ट्रातील संपूर्ण विधवा, एकल, परितक्त्या महिला उभ्या राहतील असे लहाने म्हणाले. या वेळी शाहिणाताई पठाण,प्रतिभा भुतेकर,अनिता कापरे यांनी ही विचार मांडले.

 

अश्या आहेत मागण्या…

विधवा महिला प्रतिबंधक कायदा करण्यात यावा, एकल महिलांची वारसा हक्काने येणारे प्रॉपर्टी चे वाद मिटवावे, त्यांना रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करावे, पेन्शन योजना व अनुदानाचा लाभही त्यांना देण्यात यावे, विधवा महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्याचा लाभ विधवा महिलांना देण्यात यावा, एकल महिलांचे धोरण तयार करावे, यासह विविध मागण्यांसाठी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधण्याकरता माणस फाउंडेशन ने या मेळाव्याचे आयोजन केले होते.

बुलढाणा विधानसभेत विधवांचा प्रतिनिधी उतरविणार

राजकीय पक्ष विधवा महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार असतील तर विधवा स्वतःच निवडणुकीची धुरा हाती घेतील व बुलढाणा विधानसभा मतदारसंघात एखादी विधवा महिला किंवा त्यांचा प्रतिनिधी उतरेल असे प्रा. लहाने, प्राचार्य शाहीना ताई पठाण , सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा भुतेकर,गजानन मुळे,गौरव देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले. उपस्थित महिलांनी मनोगत व्यक्त करताना याच विषयावर प्रकर्षाने जोर दिला. आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला आमच्या विचारधारेचा माणूस हवा आहे. जर राजकीय पक्ष उदासीनता दाखवत असतील तर आम्ही आमचा प्रतिनिधी निवडणुकीच्या आखाड्यात उतरवु आमचीच विधवा भगिनी निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल करेल असे भूतेकर म्हणाल्या. या मेळाव्याला ग्रामीण व शहरी भागातून मोठी उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाच संचलन कृष्णा हावरे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप जाधव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page