वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी ऋतुजाताई चव्हाण यांना…
लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडणार असल्याचा दावा....

मेहकर:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- विधानसभा रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक या अवघ्या काही दिवसावर आली आहे. सर्व ठिकाणी उमेदवारांची धावपळ होताना दिसत आहे. यामध्ये प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारीची यादी नुकताच जाहीर केली. लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघात डॉ. ऋतुजा ताई चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघात ऋतुजा चव्हाण यांच्या रूपाने परिवर्तन घडणार असल्याचे संकेत त्या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे मेहकर विधानसभा मतदारसंघात कमालीची लढत होताना दिसणार आहे.
डॉ ऋतुजा चव्हाण म्हणाल्या की अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या शिर्ष नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करत त्यांनी निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. पक्षश्रेष्ठीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून सर्वस्वी प्रयत्न करणार आणि माॅ जिजाऊ च्या आशीर्वादाने मेहकर लोणार विधानसभेत विकासाचे नवे पर्व साकार करणार असाही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. माझ्या मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची संधी पोहोचवण्यासाठी सदैव कार्यरत राहील असेही डॉ ऋतुजाताई चव्हाण यांनी सांगितले