शेअर मार्केटमध्ये पैसा लावणे पडला महागात….
गुंतवणूकदाराने गमावले 24,27,500 रुपये !

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून थांबवू शकते. बाजारात केवळ घसरणीमुळेच नुकसान होते असे नाही तर गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकजणांना आर्थिक गंडा घातला जात आहे. मलकापूर मध्ये घडलेल्या एका घटनेनंतर गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रचंड नफा कमावण्याच्या नादात तुम्ही देखील तुमच्या कष्टाचे पैसे गमावून बसाल. अशाच एका फसवणुकीला मलकापूर येथील व्यापारी बळी पडलाय ! मात्र बुलढाणा सायबर पोलिसांनी या मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून उचलले आहे.
सायबर पोलीस सूत्रानुसार,शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून मलकापूर येथील व्यापाऱ्याची 24,27,500रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी 18 2024 कलम 406, 41 ,419, 420,468 आयपीसी आर डब्ल्यू 66 सीडीआयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गणेश खैरे हा फिर्यादी व्यापारी च्या व्हाट्सअप वर शेअर मार्केट ऑफलाइन ट्रेडिंग संबंधित मेसेज करीत होता. तिप्पट नफा मिळवून देण्याचे आम्हीच दाखवून त्याने पीडित व्यापाऱ्याकडून वेगवेगळ्या अकाउंट वरून पैसे मागवले. व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधिक्षकबी. बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाने सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने सायबर पोलीस स्टेशनचे एचसी कुणाल चव्हाण,एचसी शकील खान, राजदीप वानखडे, विक्की खरात, संदीप राऊत यांच्या पथकाने गुन्ह्यांशी संबधीत सर्व बँक डिटेल्स, मोबाईल नंबर यांची पडताळणी करुन सदर प्रकरणात फसवणुक करण्या करीता फ्रॉडस्टरला विवीध लोकांचे अकाउंट पुरवणारा आरोपी गणेश नारायण खैरे वय 32 वर्षे, रा. खैरे नगर पुणे ग्रामीण शिरुर पोलीस स्टेशन हददीतुन त्याचे रहाते घरुन ताब्यात घेण्यात आले.