Homeबुलढाणा (घाटावर)
सहकार विद्या मंदिर जवळ अनोळखी मृतदेह आढळला!

देऊळगाव राजा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) अज्ञात वाहन चालकाने एका अनोळखी व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन देऊळगाव राजा पोलिसांनी केले आहे.अपघात सहकार विद्या मंदिर जवळ झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार जाफराबाद मार्गावरील सहकार विद्या मंदिर जवळ 22 ऑक्टोबरला एका अज्ञात भरधाव वाहनाने एका 45 वर्षीय व्यक्तीला उडविले.दरम्यान शिराळा येथील नागरिक युवराज सरडे यांनी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.