चार दुचाकी चोरटे एलसीबीच्या जाळ्यात!
चोरट्यांची दिवाळी जाणार अंधारात !

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) बुलढाणा जिल्ह्यात आंतरजिल्हा दुचाकीचोरांची टोळी सक्रिय झाली आहे. कुठल्याही जागेत उभी असलेली दुचाकी पळून चोरटे धूम करीत आहेत.परंतु बुलढाणा पोलीस काही कमी नाहीत. त्यांनी वर्धा,नागपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातून चोरीचे गुन्हे उघड केले असून 2,00,000 किंमतीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत.ही कारवाई बुलढाणा आणि खामगाव पोलिसांनी केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीने ही कारवाई केली.
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत होत्या. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अधिनिस्थ पोलिस स्टेशनला कारवाईसाठी आदेश दिले होते. शिवाय एका फिर्यादीने खामगाव पोलीस स्टेशनला हिरो स्प्लेंडर मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती.या प्रकरणी गून्हा दाखल करून समांतर तपास करण्यात आला.
मुख्य आरोपी विशाल दुर्योधन इंगळे वय 24 वर्षे रा. अकोट फैल अकोला,अंकीत प्रमोद मुलनकर वय 25 वर्षे रा. भेंडी ता. बार्शी टाकळी जि. अकोला, विकास बबनराव मोरे वय 31 वर्षे रा. भेंडी काजी ता. बार्शी टाकळी जि. अकोला,सिद्धार्थश्रावण खरात वय 38 वर्षे रा. माहादापुर ता. माहूर जि. नांदेड अशी आरोपींची नावे आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे प्रभारी ठाणेदार अशोक लांडे व खामगाव शहर पोलिसांनी केली.