Big breking जयश्री ताईच्या हातात आता ‘मशाल!’
जयश्रीताईंना उबाठा शिवसेनाची उमेदवारी जाहीर!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे सर्व ठिकाणी धावपळ सुरू होत आहे . अनेक पक्षांनी आपापली उमेदवारी जाहीर केली यामध्ये एक महत्त्वाची उमेदवारी म्हणजे महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यांची उमेदवारी बाकी होती.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मुंबईत ठाण मांडून बसलेल्या
जालिंदर बुधवत आणि रविकांत तुपकर व जयश्रीताई शेळके यांच्या पैकी जयश्रीताई शर्यतीत अव्वल स्थानी होत्या. अखेर त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केल्याचे वृत्त धडकत आहे. काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकी करिता ताईंची तिकीट फायनल असल्याची खात्रीलायक माहिती मुंबईतील सूत्रांकडून मिळाली आहे जयश्रीताईं शेळके,रविकांत तुपकर,जालिंदर बुधवत दुपारी मातोश्रीवर उमेदवारीसाठी चर्चे करिता गेले होते.यामध्ये रविकांत तुपकर यांची चर्चा फिस्कटली त्यांनी तडक मातोश्री सोडून ‘एकला चलो चा’ नारा दिला आहे. दरम्यान तूर्तास बुधवत यांना थांबविण्यात आले असून जयश्री ताई शेळके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.दरम्यान बुलढाणा विधानसभा निवडणुकीत जयश्रीताई शेळके उबाठा शिवसेना कडून लढणार असून इतर उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे चित्र दिसून येत आहे. बुलढाणा विधानसभेची निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याची चर्चा बुलढाणा विधानसभा मतदारसंघात रंगत आहे.
यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, सुष्माताई अंधारे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर उपस्थित होते.