Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)

बुलढाण्यात चाकू भोसकून 45 वर्षीय व्यक्तीचा खून !

Spread the love

बुलढाणा आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-  जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. असाच एक प्रकार हा बुलढाणा शहरात घडलेला आहे. धाड नाक्यावरील पाळणा घराजवळ एका इसमाचा चाकू मारल्याने खून झाल्याची घटना नेमकीच घडली आहे.रामप्रसाद तांगडे असे मृतकाचे नाव आहे.

धाड नाक्यावरील रामप्रसाद तांगडे श्याम नगर, राजपूत लेआउट येथे राहतात.त्यांचे साळू जितू गोसावी यांनी त्यांना चाकू भोसकून जागी ठार केल्याची बातमी समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच देवा भाऊ दांडगे तसेच गोपाल भाग्यवंत व त्यांचे सहकारी मित्र यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे घेऊन आले.या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page