मेहकर विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे !29 ऑक्टोंबर रोजी अर्ज भरणार उमेदवार संदीप खिल्लारे
परिवर्तनाच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन

सिंदखेडराजा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-लाखो तरुणाचे हृदय स्थान असलेल्या खासदार एडवोकेट चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने मेहकर मतदार संघामध्ये शासकीय ठेकेदार संदीप खिल्लारे यांना उमेदवारी मिळाली आहे गेल्या दोन महिन्यापासून संदीप खिल्लारे यांनी मेहकर मतदार संघामध्ये लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी सुखदुःख जाणून घेतली आहे ,त्यांनी मेहकर मतदार संघातील महामानवांच्या पुतळ्याची नोंद ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये घेण्याची मागणी केली होती व ती मागणी मान्य सुद्धा झाली.
अनेकांच्या अडीअडचणी त्यांनी सोडवले त्यामुळे संदीप खिल्लारे हे 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज मेहकर येथे भरणार असून सकाळी दहा वाजता मेहकर मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आझाद समाज पार्टी चे जिल्हा महासचिव संदीप इंगळे यांनी केले आहे,ही लढाई परिवर्तनाची आहे ही लढाई शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची असून एका आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या तरुणाला साथ देण्याची नितांत गरज आहे म्हणून सर्वांनी उमेदवारी अर्ज भरण्याकरता मेहकर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इंगळे यांनी केले आहे .
मी शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचा कट्टर पुरस्कर्ता असून सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी त्यांचं सुख दुख मला चांगल्या प्रकारे माहित आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असून लोकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे याचीच पावती म्हणून आजाद समाज पार्टी पक्षाने मला उमेदवारी दिली आहेत मेहकर मतदार संघामध्ये 25000 आमचे फिक्स मतदान आहे ‘ यावेळी परिवर्तन होणार आहे तिसरा पर्याय म्हणून लोक आजार समाज पार्टी पुढे बघत आहेत ,मी जमिनीवर ला कार्यकर्ता आहे अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढा देत असून चांगला प्रतिसाद मला लोकांचे मिळत आहे त्यामुळे 29 ऑक्टोबरला जनसागर लोटल्याशिवाय राहणार नाही.
संदीप खिल्लारे…