कोण घेणार आज अर्ज मागे…आज शेवटचा दिवस… होणार दुपारपर्यंत चित्र स्पष्ट

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे विविध घटना घडामोडी या विधानसभेच्या मैदानात दिसून येत आहे. विधानसभेची रंगत ही खऱ्या अर्थाने आज बघायला मिळणार आहे. याला कारणही तसेच आहे. आतापर्यंत विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र आज चार नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे बंड करणारे उमेदवार आज कोणता निर्णय घेतात याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर चिन्हाची वाटप होणार आहे. राज्यातील विविध मतदार संघामध्ये कहानी में ट्विस्ट बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने आपला बुलढाणा जिल्हा सुद्धा आलेला आहे कारण याला सुद्धा एक वेगळेच आहे. कारण बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्यासोबतच बुलढाण्याचे भाजप नेते विजयराज शिंदे यांनी सुद्धा आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मैत्रीपूर्वक लढतीची मागणी केली असल्याचे विजयराज शिंदे यांनी सांगितले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे मात्र आता विजयराज शिंदे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? का निवडणूक लढवणार? असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे संजय गायकवाड यांची पुत्र कुणाल गायकवाड यांनी सुद्धा चिखली विधानसभेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजयराज शिंदे यांनी आपला अर्ज हा जर कायम ठेवला तर संजय गायकवाड यांना अडचणी वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. विजयराज शिंदे यांनी जर अर्ज मागे घेतला तर कुणाल गायकवाड सुद्धा आपला अर्ज मागे घेणार असे या आधीच संजय गायकवाड यांनी सांगितले होते. तसेच मेहकर विधानसभा मतदारसंघात सुद्धा असेच चित्र दिसून आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी मिळालेली आहे. मात्र त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचे नेते लक्ष्मण घुमरे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा खरात यांना अडचणी निर्माण होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ खरात हे लक्ष्मण घुमरे व बच्छीरे यांची समजूत कशी काढणार हा सुद्धा महत्त्वाचा विषय ठरला आहे त्यामुळे दुपारपर्यंत त्या ठिकाणी सुद्धा काय चित्र निर्माण होते याकडे सुद्धा जिल्हा वासियांचे लक्ष लागलेले आहे. सिंदखेडराजा व मलकापूर विधानसभा मतदारसंघात असेच चित्र निर्माण झाले आहे. महायुतीचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना सिनखेडराजा मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे मात्र मित्रपक्ष अजित पवार गट यांच्याकडून मनोज कायदे यांना एबी फॉर्म मिळालेला आहे. एकाला माघार घ्यावा लागणार का मैत्रीपूर्वक लढत होणार हे आज दुपारपर्यंत कळणार. मलकापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडी कडून राजेश एकडे यांना उमेदवारी मिळाली आहे मात्र त्या ठिकाणी हरिष रावळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.आज दुपारपर्यंत जिल्ह्याचे चित्र काय असणार हे स्पष्ट होणार आहे.