जयश्रीताई शेळके बहुमताने विजयी होणार- जालिंदर बुधवत…
मविआच्या गावभेट दौऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: महाविकास आघाडीची फौज जयश्रीताई शेळके यांच्यासोबत असून त्यांच्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही. निष्ठावान शिवसैनिकांनी यावेळी जयश्रीताई यांना आमदार करायचं ठरवलंय. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातुन त्या बहुमताने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केला.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या गावभेट दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पाडळी, पळसखेड नाईक, दत्तपुर, उमाळा, देऊळघाट, अफजलपूरवाडी, बिरसिंगपूर आणि जांभरून येथे गावभेट दौरा व रॅली काढण्यात आली. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जयश्रीताईंनी बोरखेड व पलढग (कोमल वाडी) बुद्धेश्वर व मधुशंकर महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात केली. त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये गावकरी मोठया संख्येने सहभागी झाले. यावेळी संदीपदादा शेळके, प्रा. डी. एस.लहाने, गणेशसिंग राजपूत, लखन गाडेकर यांच्यासह गावकरी, महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद – जयश्रीताई शेळके
कुठल्याही गोष्टीची अती झाली की, त्याची माती होते. बुलडाणा विधानसभा मतदार संघात हुकूमशाही सुरू आहे. भय, भीती, भ्रष्टाचाराला लोक कंटाळले आहेत. गुंडागर्दीमुळे जगजाहीर कुणी बोलत नसले तरी आतून जे करायचे ते करणार आहेत. सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असून तीच माझी ताकद आहे, असे प्रतिपादन जयश्रीताई शेळके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले.