न डगमगता न घाबरता प्रेमलता ताई सोनवणे खंबीरपणे उभ्या…
स्वराज्य पक्षातर्फे बुलढाणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रेमलता ताई सोनवणे यांना उमेदवारी मिळाली

बुलढाणा आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- प्रेमलता ताई सोनवणे यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षातर्फे बुलढाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवली असून, त्यांचा प्रचार प्रामुख्याने तरुणांमधील बेरोजगारी, महिलांचे संरक्षण, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर केंद्रित आहे. त्यांनी विशेषतः तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच महिलांसाठी विविध योजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बुलढाणा विधानसभेचा विकास साध्य करण्यासाठी या निवडणुकीत सक्रियपणे उतरल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी, प्रेमलता ताई सोनवणे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून बुलढाणा विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली होती, आणि उमेदवारीसाठीही विनंती केली होती. मात्र, त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी स्वराज्य पक्षातून निवडणुकीत उतरून, बुलढाणाच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
धमक्यांना न जुमानता प्रेम लता सोनवणे यांनी कायम ठेवला उमेदवारी अर्ज
बुलढाणा विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या प्रेमलता ताई सोनवणे यांना अर्ज मागे घेण्याच्या धमक्या आल्या होत्या. मात्र, कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, त्यांनी ठामपणे आणि न डगमगता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यांच्या या निर्धारामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि त्यांनी निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे.