बुलढाणा पोलीस दलाची राज्यातून सर्वात मोठी कारवाई करत भिंगारा येथे जप्त केलेला गांजा तब्बल ४५ क्विंटल !
चार कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला अटक

जळगाव जामोद :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी मध्ये प्रदेश सीमेवर महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये असलेल्या भिंगारा शेतशिवारामध्ये जप्त केलेला गांजा तब्बल ४५ क्विंटल ५ किलो एवढा असल्याचे निश्चित झाले आहे. आरोपी हा अमलीपदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बिनधास्त गांजाची शेती करीत असल्याचेही पुढे आले आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. ५) पहाटे ४ वाजता दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी फिर्यादी म्हणून सरकारतर्फे जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पंकज जगन्नाथ सपकाळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी हिरालाल मांगीलाल वासकले आणि अनिल हिरालाल वासकले दोन्ही राहणार भिंगारा यांच्याविरुद्ध कलम २० एनडीपीएस, ३(५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सकाळी साडेसात वाजता आरोपी हिरालाल वास्कोले यास जळगाव जामोद पोलिसांनी अटक केली. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आली. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी खान, जळगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ यांनी घटनास्थळी भेट देऊन गांजा आणि मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये ४५ क्विंटल ५ किलो ओल्या गांजाची झाडे, पाच किलो वाळलेला ओलसर गांजा अंदाजे किंमत चार कोटी ५१ लाख, पाणी उपसण्याचे इंजिन किंमत १० हजार रुपये असा एकूण चार कोटी ५१ लाख १० हजार दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत पोलिस, शासकीय पंच राजपत्रित अधिकारी नायब तहसीलदार, वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या सर्वांनी छापा टाकला. आरोपीने त्यांच्या शेतामध्ये अवैधरीत्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली आढळून आली. विक्रीच्या उद्देशाने झाडांचे संगोपन केल्याचे निदर्शनास आले.
सदर कार्यवाही श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री. अशोक थोरात अपोअ खामगांव, श्री बी. बी महामुनी. न.पो.अ. बुलढाणा यांचे आदेशाने, श्री. मसूदखान मेहमुदखान पो. उप अधी. (मुख्या) बुलढाणा प्रभार, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. श्रीकांत निचड, पोउपनि पंकज सपकाळे, नागेश खाडे, नारायण सरकटे, पोहेकों. उमेश शेगोकार, बाळकृष्ण पवार (ता.नि.वि.शा.), निलेश पुंडे, पोना ईरफान शेख, पोकों, प्रफुल्ल डब्बे, संदिप रिंढे, सुपाजी तायडे, सतीश पाटोळे, सागर तांदळे, सचिन राजपूत, विलास पहाड, मंगेश सोळंके, गणेश हाडे, भारत बोंद्रे, चालक पोकों, स्वप्नील झुंजारकर, स्वप्निल म्हस्के पो स्टे. जळगांव जामोद यांच्या पथकाने केली आहे.