सर्पमित्र विनय कुलकर्णी यांची कौतुकास्पद कामगिरी
५० मिनिटात ४ सापांना दिले जीवदान....

लोणार:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी (राहुल सरदार):- दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सर्पमित्र तसेच निसर्ग मल्टिपर्पज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी वेग वेगळ्या चार ठिकाणाहून चार सापांना दिले जीवदान, रात्री ९.०८ वाजता शारा गावात कैलास पंढरे यांच्या घरी कवड्या जातीचा बिनविषारी साप, ९.२४ वाजता सुनिल वाघ राहणार किन्ही यांच्या शेतातील गोठ्यात ४.५० फूट लांबीचा विषारी नाग साप, ९.४४ वाजता लोणार चे तहसील कर्मचारी पुरुषोत्तम आघाव राहणार इरतकर नगर लोणार यांच्या घरी ३.५० फूट लांबीचा विषारी घोणस साप तसेच रात्री ९.५८ वाजता सलमान शेख राहणार घरकुल परिसर यांच्या घरी ४ फूट लांबीचा विषारी नाग सापाला दिले जीवदान, यावेळी सर्पमित्र कमलेश आगरकर आणि विशाल वर्मा यांनी सहकार्य केले. नंतर वन विभागाच्या उपस्थितीत सापांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
कोणाच्या शेतात व घरात साप आढळल्यास त्याला न मारता सर्व मित्राला कॉल करा व सापांना जीवदान द्या असे आवाहन सर्पमित्र विनायक कुलकर्णी यांनी केले आहे