Homeजिल्‍ह्याचे राजकारणबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

ठाकरे यांची बुलढाण्यात रेकॉड ब्रेक विराट सभा…

जयश्रीताई शेळके यांच्या वादळी भाषणामुळे गरजली सभा...

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-बुलढाणा शहरात आज भगव वादळ गरजल आहे. उबाठा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आज बुलढाणा येथे भव्य अशी रेकॉड ब्रेक विराट सभा झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारासाठी पार पडलेल्या सभेला प्रचंड गर्दीची लाट हि उसळून आली आहे. या सभेमध्ये भाषणे सुध्दा मोठ्या प्रमाणात गाजलेली ठरली आहे. उद्वव ठाकरे यांनी विरोधाकांचा कडक भाषेत चांगालाच समाचार घेतला आहे. बुलढाणा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवाराचे नाव न घेता हल्ला चढवत गद्दाराना गाडण्याचे आवाहन त्यांनी या सभेत केले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. यावेळी पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात आपलंच वार आहे. दुसऱ्या कुणाचं वार नाही. लोकसभेला निसटता पराभव झाला पण तो चटका लावून गेला. त्या गद्दाराची वेळ टळली पण या गद्दाराची वेळ टळणार नाही. या गद्दाराला गाडायच म्हणजे गाडावाचंच असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदींना कोण हरवू शकेल असे अनेकांना वाटू शकत होते.. मात्र महाराष्ट्रानेच त्यांना रोखले असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या विरोधात महाराष्ट्रद्रोही आहेत. गेल्या २०१९ ला माझी चूक झाली. मात्र आता जयश्रीताई आपल्या उमेदवार आहेत, त्यामुळे आता त्या चुकीची पुनरावृत्ती होऊ देणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.राज्यात आपल सरकार आल्यानंतर

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. हे गद्दार जिकडे पळून गेले त्या सुरत मध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे असेही ठाकरे म्हणाले. महायुतीवाले केवळ मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात असा हल्लाबोलही ठाकरे यांनी चढवला. जाऊ तिथे खाऊ अशी महायुती सरकारची वृत्ती आहे, या गदरांना कचऱ्यापेक्षा कमी भाव देऊन फेकून ग्रा. ही मशाल आता पेटलेली आहे असेही ठाकरे म्हणाले. विरोधकांना प्रचारासाठी बाहेरून लोक आणांवी लागत आहे असे म्हणत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र मी तुम्हाला करून दाखवेल असा शब्दही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. विदर्भाने भाजपला सर्वाधिक जागा दिल्या. गेल्या १० वर्षात विदर्भातील किती तरुणांना रोजगार मिळाला? असा सवाल यावेळी ठाकरे यांनी केला. मी अडीच वर्षांत काम करून दाखवलं होत म्हणून बोलतोय असेही ते म्हणाले. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करणार आहोत. डाळ, तांदूळ, तेल, गहू, साखर या ५जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होता. आम्ही स्थिर ठेवून दाखवू असेही उद्वव ठाकरे आपल्या भाषणा- तून म्हणाले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून जयश्रीताई शेळके यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आ वाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

 

टपरीबाज, छपरीबाज, गुंडशाही आणि फेकूचंद असे म्हणत आ. संजूभाऊ गायकवाड यांच्यावर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात…

बुलढाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यात हजारोंच्या संख्येत जाहीर सभा झाली या सभेत महाविकास आघाडीतील मान्यवरांच्या उपस्थित माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या रोखठोक भाषणात सध्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. सपकाळ यांनी गायकवाड यांना टपरीबाज, छपरीबाज, गुडशाही, आणि फेकूचंद अशा नावांनी हिणवले. त्यांनी गायकवाड यांच्यावर आरोप करताना त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सपकाळ यांच्या या टिकेमुळे बुलढाणा विधानसभा निवडणुकीतील वातावरण तापले असून, निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे आहेत.

 

जयश्रीताई यांची वादळी गर्जना…

जयश्रीताई शेळके यांचे भाषण हे वादळी गर्जना उरली आहे. त्यांनी आपल्या भाषणातून विरोधाकांचा चांगलाच समचार घेतला आहे. त्यांचे आजचे भाषण हे चांगलेच गाजले आहे. जयश्रीताई शेळके यांनी विद्यामान आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता त्यांच्या हल्ला चढविला आहे. बुलढाणा मतदारसंघात सिंचनाचा कोणताही प्रकल्प नाही. शेतकऱ्यांचे कामे रखडली आहे. बेरोजगाराच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी यांनी काही काम केल नाही असा आरोप जयश्रीताई शेळके यांनी केला आहे. इथे आता शिवसेनेच्या जुन्या लोकांना धमकावल्या जात आहे मात्र घाबरू नका हा नकली शिवसेनेचा उमेदवार आहे. नकली दाताप्रमाणे हा माणूसही नकली आहे. ये शेर नहीं भेडीया है असे जयश्रीताई शेळके म्हणाल्या त्यांच्या पापांचा घडा आता भरला आहे असेही जयश्रीताई म्हणाल्या आहे.

उद्धव ठाकरेंनी जालिंदर बुधवतांना दिला शब्द…

बुलढाणा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ शिव- सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी जालिंदर बुधवत यांच्याबद्दल एक खास किस्सा सांगितला. उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या भावना आणि दिलेला शब्द हे बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना कार्यकत्यांसाठी महत्वपूर्ण होते. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, गद्दारांनी शिवसेना सोडून गेल्यानंतर, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेची धुरा जालिंदर बुधवत आणि नरुभाऊ खेडेकर यांनी सांभाळलो. त्यावेळी बुधवत यांना विधानसभेसाठी तयारी करण्याचे सांगितले हो ते, मात्र जयश्रीताईंना उमेदवारी देणे गरजेचे बनले. तेव्हा बुधवत यांनी साहेब, तुमचा आदेश म्हणत कुठलेही आग्र्क्युमेंट न करता मागे यांवण्याचा निर्णय घेतला. अशा निष्ठावंताला आता विधान परिषदेच्या आमदार पदाची संधी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page