आझाद समाज पार्टीचे संदीप खिल्लारे मेहकर विधानसभा मतदारसंघात फिनिशरची भूमिका पार पाडणार ।
ठिकठिकाणी मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद

मेहकर:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराचा जोर वाढत आहे आधार समाज पार्टी भीम आर्मीचे उमेदवार संदीप खिल्लारे यांनी सुद्धा आपल्या प्रचाराचा वेग पकडला असून मेहकर मतदार संघामध्ये अनेक ठिकाणी जनतेचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे सर्व जाती-धर्माच्या लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत असून मेहकर मतदारसंघांमध्ये ,आझाद समाज पार्टीची किटली हे चिन्ह सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचत आहे ,त्यामुळे सध्या आजार समाज पार्टीने प्रचारात कमालीचा वेग पकडला आहे
मेहकर मतदार संघामध्ये अनेक तरुणांमध्ये खासदार चंद्रशेखर आझाद यांची क्रेझ निर्माण झाली असून मेहकर येथे होणाऱ्या सभेनंतर वारे कमालीचे पलटणार आहे ,डोणगाव शहर मेहकर शहर घाटबोरी जानेफळ लोणी गवळी लोणार सुलतानपूर देऊळगाव साखरशा .या प्रमुख मोठ्या गावामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे ठिकठिकाणी महिला त्यांना ओवाळून आशीर्वाद देत आहे ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत आहे ,
अल्पसंख्याक समाजातील बांधव सुद्धा त्यांच्यासोबत असून ठिकठिकाणी त्यांचे हार घालून स्वागत करण्यात येत आहे हे सर्व चित्र बघून नक्कीच प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकू लागले असून अनेकांनी संदीप खिल्लारे यांच्या प्रचाराचा धसका नक्कीच घेतला आहे संदीप खिल्लारे यांचा प्रचाराचा झंजावत त्यांना विजय रथापर्यंत पोहोचवेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये संदीप खिल्लारे यांच्या प्रचाराचा वेग नक्कीच वेगवान असणार यात शंका नाही ‘