वंचित चे अॅड प्रकाश आंबेडकर यांची आज बुलढाण्यात सभा…
प्रशांत वाघोदे यांच्या प्रचारार्थ...

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- स्टार प्रचारकांच्या सभांची सध्या राळ उडत असून, आज 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक टिळक नाट्य क्रीडा मंदीर, जिजामाता प्रेक्षागार मैदान येथे वंचीतचे उमेदवार प्रशांत वाघोदे यांच्या प्रचारार्थ वंचीतचे सुप्रिमो अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होत आहे. आंबेडकर आपल्या भाषणातून कोण कोणत्या मुद्यांवर बोट ठेवतात ? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
बुलढाणा विधान सभा मतदार संघात वंचीत बहुजन आघाडी कडून प्रशांत वाघोदे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. महायुती व महा विकास आघाडीने स्टार प्रचारकांच्या सभेला तत्पूर्वीच सुरुवात करून दिली. दरम्यान वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची आज जाहीर सभा होत आहे. बुलढाणा विधान सभा मतदार संघात वंचीतची मोठी ताकद आहे.