जयश्रीताई शेळकेंसाठी एकवटले समाज बांधव .
संजय राठोड यांच्या नेतृत्वात बंजारा समाजाची वज्रमुठ!

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा विधानसभा मतदारसंघात चांगलेच मतदान असलेल्या बंजारा समाज बांधवांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांना विजयश्री चा आशीर्वाद दिला आहे.त्यासाठी बंजारा समाज बंधु भगिनी आणि युवकांनी वज्रमुठ बांधली आहे.
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड.जयश्री सुनिल शेळके यांना निवडून आणण्यासाठी बुलढाणा येथे बंजारा समाज बांधवाची बैठक सपन्न झाली. समाजाचे एकमुखी नेतृत्व आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या पुढाकाराने ही बैठक लावण्यात आली होती.याप्रसंगी सर्व बंजारा समाज बांधवांनी आपल्या भावना मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केल्या. तसेच महाविकास आघाडीला आपला पाठींबा जाहीर केला. जयश्रीताई शेळके यांना निवडून आणण्याचा दृढ संकल्प यावेळी करण्यात आला.
बुलडाणा विधानसभा मदारसंघातील बंजारा समाज बांधव हा ॲड.जयश्री सुनिल शेळके यांच्या सोबत असून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना संजय राठोड यांनी व्यक्त केली.या बैठकीला अभिता कंपनी चे सीईओ व चित्रपट निर्माता सुनिल शेळके , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील, बुलडाणा काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम नाईक, मोताळा पंचायत समिती माजी सभापती उखा चव्हाण हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ चव्हाण यांनी केले. यावेळी ॲड.संजय राठोड, सुनिल शेळके , ॲड.गणेश पाटील,तुळशीराम नाईक, उखा चव्हाण, विट्ठल चव्हाण,भूपेश जाधव,राजेश फकीरा राठोड, दिगंबर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी उच्चशिक्षित, सर्व जाती धर्माना घेऊन जयश्री ताईंना पाठबळ देण्याचे आवाहन केले.आभार प्रदर्शन सरपंच साहेबराव चव्हाण यांनी केले.
यावेळी शेषराव राठोड, छगन राठोड, बद्दूसिंग जाधव, चंपालाल महाराज, दिलीप राठोड, विष्णू जाधव, बंडू चव्हाण, रघुनाथ जाधव, काशिनाथ पवार, शाम प्रल्हाद राठोड, तुकाराम जाधव, उखा जाधव, अनिल चव्हाण, इंदल चव्हाण, ताराचंद पवार, रमेश राठोड, विनोद राठोड, राहुल चव्हाण, सुरेश चव्हाण, दीपक चव्हाण, दिनकर पवार, जगन्नाथ झाडे, दशरथ राठोड, संदीप राठोड, तुकडू जाधव, इंदल राठोड, भिका चव्हाण, गोविंद नाईक, रोहिदास राठोड, विपुल राठोड, अंकुश पवार, विकास डांगे, प्रकाश बस्सी, शेनसिंग रबडे, रामदास नाईक, तुकाराम राठोड, रामेश्वर चव्हाण, दिलीप राठोड, शिवदास जाधव, छगन चव्हाण व बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.