पक्षाला जीवदान देऊन केला वन्यजीव सोयरे बुलढाणा ने पक्षी सप्ताह साजरा

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर १९३२ व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांचा १२ नोव्हेंबर १८९६ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा करतो. पक्षी हे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय जीव आहेत. जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या पिसे असलेले दोन पायांचे प्राणी. पक्ष्यांची उत्पत्ती प्राचीनकालीन डायनासॉरपासून झाल्याचे मानण्यात येते. पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, बीजप्रसार होतो, निसर्गाची सुंदरता वाढते. सकाळी सकाळी पक्ष्यांचे सुमधुर आवाजाने आपण ताजेतवाने होतो.
पक्षी सप्ताह कसा साजरा करावा हा एक प्रश्न वन्यजीव सोयरे होता. दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी वन्यजीव सोयरे मुकुंदभाऊ वैष्णव यांचे वैष्णव पुस्तकालय समोर वन्यजीव सोयरे गणेशकाका श्रीवास्तव आणि मुकुंदभाऊ वैष्णव यांना एक पक्षी वाहनाच्या फटक्याने जख्मी अस्वस्थ पडलेला दिसला. त्यांनी सदर पक्षाला पाणी पाजले आणि पुढ़िल उपचारासाठी वन्यजीव सोयरे परिवारात ठेवले.
एक दिवस वन्यजीव सोयरे परिवारात उपचार घेऊन स्वस्थ होऊन उड़ायचे सामर्थ्य आल्यावर दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी वन्यजीव सोयरे नितिन श्रीवास्तव यांच्या मार्गदर्नाने वन्यजीव सोयरे गणेश श्रीवास्तव, संदीप दळवी आणि मुकुंद वैणव यांनी सदर पक्षी ऊंबराच्या झाडावर सोडले. पक्षीन ऊंबराच्या झाडावर उडाला पाहुन जो आनंद झाला खर तर आज पक्षी सप्ताह साजरा करायचे सार्थक झाले.