प्रशांत वाघोदे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा संपन्न
सत्ताधारी व विरोधकांना प्रशांत वाघोदे यांचा इशारा....

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:’ वंचित बहुजन आघाडी यांची बुलढाणा विधानसभेचे उमेदवार प्रशांत वाघोदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार होते मात्र काही कारणास्तव या सभेला ते उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांची धुरा ही प्रशांत वाघोदे यांनी सांभाळली.
आज 11 नोव्हेंबर रोजी टिळक नाट्य मैदानावर ही भव्य सभा आयोजित करण्यात आली या सभेला तळागाळातून असंख्य लोक या सभेला उपस्थित होते. युवा पिढी, वृद्ध ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत वाघोदे यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी व विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड तर महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यावर शाब्दिक शैलीत समाचार घेतला. मतदारसंघातल्या विविध विषयावर त्यांनी वाचा फोडला. कोणालाही बळी न पडता योग्य उमेदवाराला आपण मतदान करावे असे त्यांनी सांगितले. महायुती आणि महाविकास आघाडी यांनी जो बुलडाणा विधानसभेमध्ये संभ्रम निर्माण केला त्याविषयी बोलताना त्यांनी सर्व मांडणी ही जनतेसमोर मांडली. विधानसभेत दोन गद्दार म्हणून त्यांनी महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बोलले आहे. या सभेमध्ये एक अनोखा क्षण बघायला मिळाला आहे. या सभेमध्ये आलेली ही जनता कुठलीही पैसे देऊन आलेले नाही ही स्व इच्छेने आलेली जनता आहे. अनेक महिलांनी आपापल्या पद्धतीने प्रशांत वाघोदे यांना मदत केली आहे अनेक महिला ग्रुप तयार करून तर कोणी आपापल्या पद्धतीने स्व इच्छेने मदत केली आहे. वृद्ध सह अनेक लोकांनी आपल्या एक दिवसाची मजुरी ही प्रशांत वाघोदे यांना अर्पण केली. हे सर्व बघून प्रशांत वाघोदे हे भावुक झाले. वंचित बहुजन आघाडीची बुलढाणा विधानसभेमध्ये सुद्धा चांगली वज्रमुठ आहे याला प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे त्यावेळेस उमेदवार असलेले विजयराज शिंदे यांनी 42000 मतदान घेतले होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला कमी समजण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी किंवा विरोधकांनी घेण्याचा प्रयत्न करू नये असे प्रशांत वाघोदे यांनी सज्ज इशारा दिला आहे. सभा संपल्यानंतर जयस्तंभ चौक येथे महापुरुषांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून आपली प्रचार रॅली शहरांमध्ये काढण्यात आली. जयस्तंभ चौक येथे फटाक्याची आतिश बाजी सुद्धा करण्यात आली. आज बुलढाणा शहरात वंचित बहुजन आघाडीचे सभेचे भव्य स्वरूप बघायला मिळाले आहे.