विकास झाला नाही, कोट्यावधींचे कमिशन खाल्ले! प्रचार दौऱ्या दरम्यान जयश्रीताई शेळके यांचा हल्लाबोल!
भीम नगरातील प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद!

बुलढाणा :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- पाहिजे तसे विकास कार्य बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झाले नाही.केवळ विकासाचे आकडे फुगवून सांगितले गेले.कोट्यावधींचा निधी आणलाय म्हणतात तसे असते तर या परिसराचा कायापालट झाला असता.प्रत्यक्षात तसे झाले नाही करोडो रुपयांचे कमिशन खाल्ले गेले. मोठा भ्रष्टाचार झालेला आहे.त्यामुळे मला संधी मिळाल्यास भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त बुलढाणा विधानसभा मतदारसंघ करण्याकरिता मी कटिबद्ध राहील मतदारांनी मलाही संधी द्यावी,अशा महाविकास आघाडीच्या उबाठा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके म्हणाल्या. आज बुलढाणा शहरातील भीम नगर वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रचारदौऱ्या दरम्यान त्या बोलत होत्या.
महाविकास आघाडीचा प्रचार धडाक्यात सुरू असून आज उबाठाच्या उमेदवार जेसीबी शेळके यांनी भीम नगर वार्ड क्रमांक 2 पिंजून काढला.यावेळी त्या म्हणाल्या की,लोकांनीच आपली निवडणूक म्हणून हाती घेतली आहे.लोकांमध्ये प्रचंड जोश जल्लोष आणि उत्साह ओसंडून वाहत आहे.लोक वीस तारखेची वाट पाहत आहेत.महा विकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष या निवडणुकीत ताकदीने उतरले असून महिलांचा मोठा सहभाग आहे.मला संधी मिळाली तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असा विश्वास यावेळी शेळके ताईंनी व्यक्त केला.दरम्यान डी एस लहाने म्हणाले की,महाविकास आघाडीने मानस फाउंडेशन ने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला.त्यांनी एकल महिला,विधवा घटस्फोटीत महिला संदर्भात न्याय देण्यासाठी जाहीरनाम्यात उल्लेख केला आहे.शिवाय त्यांनी विधवा प्रताप प्रतिबंधक कायदा व महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापित करण्याचे अभिवचन दिले आहे.त्यामुळे महिलांनी जयश्रीताई शेळके यांच्या मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन डी एस लहाने यांनी केले आहे.