केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीची तपासणी!

बुलढाणा ( आपला बुलढाणा जिल्हा बातमी )विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हा सह राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहे.या अनुषंगाने सिंदखेडराजा प्रचार दौऱ्या दरम्यान जालना -देऊळगावराजा रोडवर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगांच्या आदेशाचे निवडणूक अधिकारी पालन करीत असून त्यांच्या या कर्तव्यपूर्तीचा ना. जाधवांनी आदर केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात अनेक ठिकाणी रोख रकमेची जप्तीची कारवाई करण्यात आली होती तर त्याची सत्यता पडताळून रक्कम सोडण्यात आली. निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवू नये, अशी तरतूद आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणी यंत्रणा कार्यरत असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथके (एस.एस.टी.) आणि भरारी सर्वेक्षण पथके (एफ.एस.टी.) तैनात आहेत.