सामाजिक कार्यकर्ते पत्रकार करण विनोद झनके यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…!

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- तालुक्यातील धरणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार करण विनोद झनके यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि १४/११/२०२४ रोजी जि. प.के.मराठी प्राथमिक शाळा धरणगावं येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले
तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंतीनिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेतील मुख्याध्यापक पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सांगितले की आपल्या वाढदिवसाच्या अतिरिक्त खर्च न करता विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तो खर्च करावा जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होणार त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, यावेळी शाळेतील मुख्याध्यापक पाटील सर शिक्षक वृंद धरणगाव ग्रामपंचायत सदस्य रमेश झनके, सतीश इंगळे ,अमोल झनके प्रवीण झनके,सुमेध सरकाटे, शंकर कवळे, आदी उपस्थिती होती.